Tuesday, June 30, 2026
Homeआरमोरीमालवाहू रिक्षा आणि दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीचालक विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू... - आरमोरी...

मालवाहू रिक्षा आणि दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीचालक विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू… – आरमोरी तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-मालवाहू रिक्षा आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने यात १९ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल,रविवार १५ डिसेंबरला सकाळच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील वनखी(वासाळा)गावाजवळ घडली.मंथन प्रकाश लाकडे रा.चामोर्शी (माल) ता. आरमोरी असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की,मंथन हा काल रविवारी सकाळच्या सुमारास गावापासून काही अंतरावर असलेल्या ठाणेगाव येथील दूध डेअरीवर घरच्या पशुधनांचे काढलेले दूध देण्यासाठी गेला होता. अशातच डेअरीवर दूध देऊन दुचाकीने चामोर्शी (माल)या आपल्या गावाकडे परत येत असतांना वनखी(वासाळा)ते चामोर्शी (माल)डांबरी मार्गावरील रामदास खेवले यांच्या शेताजवळ समोरून येणाऱ्या तीनचाकी मालवाहू रिक्षाने मंथनच्या दुचाकीला समोरासमोर जबर धडक दिली.जबर धडक देतातच मंथन खाली कोसळला,त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालक देवराव शंकर साळुंखे, नेहरूनगर,चंद्रपूर याच्या विरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तीनचाकी मालवाहू रिक्षा
पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्प दंशाने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपुर :-एका सहा वर्षीय चिमुकल्याचा सर्प दंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.समीर मारोती आत्राम वय...

गडचिरोली जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा.. – ‘शिक्षण ही दररोजची तपस्या’-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी गडचिरोली जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास विभागाच्या पुढाकारातून...

आज उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविण्याची शेवटची तारीख; उद्यापासून हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त :-जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट(एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत आज,मंगळवार ३० जून रोजी संपत असून,त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार...

भव्य प्रवेशोत्सवातून शिक्षणाचा नवा अध्याय.. – महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड देसाईगंज येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आयएसओ मानांकन प्राप्त महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा, नैनपूर वार्ड,देसाईगंज येथे आज,मंगळवार ३० जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवसानिमित्त प्रवेशोत्सव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!