Wednesday, June 10, 2026
Homeनागपूरमहिला पोलीस उपनिरीक्षकाविरूध्द एसीबीची कारवाई..

महिला पोलीस उपनिरीक्षकाविरूध्द एसीबीची कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दहा हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वाठोडा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षकाविरोधात नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी)कारवाई केली आहे.प्रणाली बेनके ,महिला पोलीस उपनिरीक्षक,पोलीस स्टेशन वाठोडा, नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन वाठोडा,नागपूर शहर येथे लाचेच्या मागणीबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रारदार यांनी तक्रार केली की,तक्रारदार यांनी एका महिलेकडून केलेल्या कामाचे कमीशनचे पैसे न मिळाल्यामुळे पोलीस स्टेशन वाठोडा येथे तक्रार अर्ज दिला होता.सदर अर्जाचे चौकशी दरम्यान सदर महिलेने तक्रारदार यांचेविरूध्द छेडछाडीची तक्रार केली होती.त्यानुसार तक्रारदार यांचेविरूध्द कार्यवाही न करण्याकरिता महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणाली बेनके यांनी खाजगी इसमामार्फत २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार यातील तक्रारदार यांनी ॲन्टी करप्शन ब्युरो नागपूर कार्यालयात केली होती.सदर तक्रारीचे अनुषंगाने सापळा अधिकारी यांनी लाचेच्या मागणीबाबत पडताळणी कार्यवाही केली असता तडजोडीअंती १० हजार रुपये लाच रक्कम पोलीस स्टेशन वाठोडा नागपूर शहर येथे स्विकारण्याची तयारी दर्शविली.नंतर,प्रणाली बेनके यांना तक्रारदार यांचेवर संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम स्विकारली नाही.त्यावरून,मंगळवार २ जून रोजी प्रणाली बेनके यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन वाठोडा,नागपूर शहर येथे लाचेच्या मागणीबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई डॉ.दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर,माधुरी बाविस्कर अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर,विजय माहुलकर अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक  शुभांगी वानखेडे यांचे पर्यवेक्षणात सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रविन्द्र सहारे,सापळा पथक पोलीस निरीक्षक वैशाली आठवले,मपोहवा अस्मिता मल्लेलवार,सरिता मेश्राम, अनिल बहिरे,पोना मिलींद मेश्राम,चालक मपोशि हर्षलता भरडकर यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!