Friday, September 25, 2026
Homeदेसाईगंज'महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन तथा रेझिंग डे' दिनानिमित्य रक्तदान शिबिर संपन्न.. ...

‘महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन तथा रेझिंग डे’ दिनानिमित्य रक्तदान शिबिर संपन्न.. -देसाईगंज पोलिस ठाण्याचे स्तुत्य उपक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-‘महाराष्ट्र पोलिस दलाचे स्थापना दिन तथा रेझिंग डे’ दिनाचे औचित्य साधुन आज,रविवार ५ जानेवारीला देसाईगंज पोलिस ठाण्याच्या वतिने स्तुत्य उपक्रम राबवित भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.या प्रसंगी कुरखेडा उपविभागिय पोलिस अधिकारी रविन्द्र भोसले,देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अजय जगताप,कुरखेडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महेन्द्र वाघ,कोरची पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शैलेन्द्र ठाकरे, देसाईगंज ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप आगरकर,सहाय्यक पोलीस निरिक्षक मनिष गोडबोले, पोलीस उपनिरिक्षक चेतन परदेशी यांचेसह पोलिस दलाचे शिपाई तथा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन तथा रेझिंग डे’ दिनाचे औचित्य साधुन गडचिरोली पोलिस विभागाच्या वतीने पोलिस प्रशासन व नागरिक यांच्यात सुसंवाद साधावा तसेच पोलिस विभागाच्या वतीने शासकिय योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावी,यासाठी ‘रेझिंग डे’ च्या माध्यमातुन २ जानेवारी ते ८ जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.त्यानुसार देसाईगंज पोलिस ठाण्याच्या वतीने २ जानेवारीला सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप आगरकर यांनी स्पर्धेत भाग घेणाऱ्या ५३ शालेय विद्यार्थ्यांना भेट वस्तु तसेच प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यास रनिंग श्युज वितरित करण्यात आले. ३ जानेवारीला महिला सुरक्षा संदर्भात महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सायबर गुन्ह्यांची माहिती व स्व: संरक्षण करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.४ जानेवारीला शहर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.तसेच प्रशासकिय कार्यालये,आरोग्य विभाग,महाविद्यालये,रेल्वे स्टेशन,बस स्थानक,अश्या विविध ठिकाणी स्वच्छतेचे महत्व पटवुन देण्यात आले.आज रविवारी विशेष कार्यक्रम आयोजित करुन पोलिस दलातर्फे वृक्षारोपण व भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.यावेळी तब्बल १६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.सदर कार्यक्रमास पोलिस दलातील कर्मचारीवर्गांसह नागरिकांनी उत्सफुर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘पीएम-जनमन’ अंतर्गत तुलशी पिडसे यांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार.. – योजनेअंतर्गत ६ हजार ८७२ घरकुलांना मंजुरी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी येथील तुलशी दस्सा पिडसे यांच्या पक्क्या घराचे स्वप्न ‘पीएम-जनमन’ अंतर्गत मंजूर घरकुलामुळे साकार झाले आहे.प्रतिकूल कौटुंबिक...

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!