Friday, September 25, 2026
Homeनागपूरवाघिणीला पाहण्यासाठी वाहनांनी घातला गराडा.. - चार जिप्सी चालक व पर्यटकांचे चार...

वाघिणीला पाहण्यासाठी वाहनांनी घातला गराडा.. – चार जिप्सी चालक व पर्यटकांचे चार मार्गदर्शक गार्ड निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-अनेकदा अभयारण्यात वाघ,बिबट्,वाघीण तसेच विविध प्राणी पाहण्यासाठी पर्यटकांची रेलचेल असते.केव्हा-केव्हा तर बुकिंग हाऊसफुल झालेली असते.अशातच पर्यटकांसाठी सर्व दारे खुले असतांनाच अभयारण्य वा राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांकडून काही निर्बंध लादले जातात.याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असते.त्यातच नागपूर जिल्ह्यातील उमरेड करांडला अभयारण्यात एक वाघीण आणि तिच्या पाच पिल्लांना पर्यटकांच्या जिप्सींनी घेराव घातलेला होता.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने सदर  प्रकरण चांगलेच भोवले आहे.या प्रकरणी चार जिप्सी चालक व पर्यटकांचे चार मार्गदर्शक गार्ड यांना निलंबित करण्यात आले आहे.प्रत्येक जिप्सी चालकाला २ हजार ५०० रुपये तर मार्गदर्शक यांना प्रत्येकी ४५० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.गेले काही दिवस उमरेड करांडला अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वार परिसरात ही वाघीण आणि तिचे पिल्ले पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.यावेळी देखील तिचे दर्शन झाल्याने छायाचित्र काढण्यासाठी पर्यटकांमध्ये चढाओढ सुरू होती. यातूनच वाघिणीला या वाहनांनी गराडा घातला होता.या चालकांवर आठवडाभर कालावधीसाठी हे निलंबन असणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!