- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-सर्वचजण मद्य प्राशन करतात असे नाही, काहीजण ‘मिली तो मारी अन्यथा सदा ब्रम्हचारी’ असेही असतात.त्यातच काहींचा वेळ ठरलेला असतो,दिवसभर इतर कामे करून घ्यायची व नंतर सायंकाळच्या सुमारास सब ‘शिकवे गीले’ दूर करायचा बेत आखत असतात.असाच बेत आखणाऱ्या मद्य प्रेमींना जोरदार झटका बसला आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील राजुरा-बामणी मार्गावर असलेल्या एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये मद्य प्राशन करण्यास गेलेल्या मद्य प्रेमींना चकन्यात दिलेल्या चाट मसाल्यात चक्क जिवंत अळ्या आढळून आल्याने एकच तारांबळ उडाली आहे.सदरचा धक्कादायक प्रकार शनिवारी सायंकाळच्या सुमारास उघडीस आला असून हॉटेल मालक ग्राहकांच्या जीवाशीनिशी खेळत असल्याने सदर हॉटेल मालकावर कारवाई करून हॉटेलचा परवाना रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
राजुरा-बामणी मार्गावर एक बार अँड रेस्टॉरंट आहे. हॉटेल मध्ये मद्य प्राशन करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांनी मद्य बोलावले.मद्यासोबत बारच्या वतीने काही ठिकाणी ग्राहकांना काहीतरी चकना दिल्या जाते.सदर ग्राहकांना चकना म्हणून चाट मसाला देण्यात आला.त्यातच दिलेल्या चाट मसाल्यात चक्क जिवंत अळ्या आढळून आल्याने ग्राहकांनी डोक्यावर हात ठेवला.ग्राहकाच्या लक्षात येताच त्यांनी हॉटेल मॅनेजरला बोलावून निकृष्ट दर्जाचा चाट मसाला,त्यात जिवंत अळ्या असल्याचे दाखविताच त्यांची तारांबळ उडली.त्यावेळेला हॉटेल मध्ये असलेल्या इतरही ग्राहकांनी रोष व्यक्त केला. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न व औषध विभागाने या हॉटेलची व हॉटेलच्या स्वयंपाक गृहाची तपासणी करून नियमानुसार याठिकाणी मद्याची विक्री होते की नाही,जीएसटी प्रमाणे बिल दिल्या जाते की नाही, स्वयंपाक गृहात योग्य काळजी व स्वच्छता राखली जाते की नाही,यासह अन्य बाबींची तपासणी करून कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
- Advertisement -