उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला धडक देताच; ट्रेलरने दिलेल्या धडकेत ट्रेलरच्या चाकाखाली आलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना आज २६ मार्च रोजी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात घडली.
राजपूत मते वय ५६ वर्षे असे मृत्यू झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कर्मचाऱ्याचे नाव आहे.भंडारा पोलीस लाईन येथे राहणारे राजपूत मते हे लाखनी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक पदावर कार्यरत होते.आज राजपूत मते हे सकाळी बाजारातून भाजी घेऊन दुचाकीने घरी जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने त्यांना धडक दिली. धडकेत राजपूत मते हे थेट ट्रेलरच्या चाकाखाली आले.चाकाखाली चिरडले गेल्याने राजपूत मते यांचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती भंडारा पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठून ट्रेलर चालकास ताब्यात घेऊन मयत शव रुग्णालयात शविच्छेदणासाठी पाठविले आहे.