Wednesday, October 21, 2026
Homeभंडाराभरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-एका अज्ञात भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारच्या सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लाखांदूर ते पवनी मार्गावरील परसोडी(नाग)गावाजवळ घडली.लोमेश मधुकर राऊत वय २४ वर्षे,रा.कुडेगाव असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
लोमेश राऊत हा काही कामानिमित्त लाखांदूरला गेला होता.तेथील कामे आटोपून सायंकाळच्या सुमारास  दुचाकीने स्वगावी जात असतांनाच लाखांदूर-पवनी मार्गावरील परसोडी(नाग)गावाजवळ एका अनियंत्रित  भरधाव ट्रॅक्टरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.सदरचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू करून पोलिसांना पाचारण केले.अज्ञात वाहन धडक देऊन पसार झाला. दरम्यान,लोमेशला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर तपास सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार...

गडचिरोली सायबर कमांडो पथकाची उल्लेखनीय कामगिरी.. -हरवलेले तब्बल ६ लाख रुपये किंमतीचे २१ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विजयादशमी हा सण सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर विजय मिळविण्याचा संदेश देतो.याच शुभमुहूर्तावर आज गडचिरोली पोलीस स्टेशनने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद...

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा.. -दहा दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-सन २०२६ च्या खरीप हंगामात अनियमित पाऊस,वाढते तापमान,वादळ,कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच वन्यप्राण्यांमुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर देसाईगंज...

‘तिच्या’ त्रासाला अन् वादाला वैतागला; शिक्षकाने केली प्रेयसीची हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर प्रेयसीच्या हत्येने झाल्याची घटना नुकतीच चंद्रपुरात उघडकीस आली.प्रेयसीच्या हत्येप्रकरणी आरोपी शिक्षकास अटक करून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!