- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-श्री संत गजानन महाराज परायण सेवा समिती नागपूरच्या वतीने “जय गजानन काव्यानंद स्पर्धा २०२४”या भक्तिमय काव्यस्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आलेले होते.यामध्ये सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन कवितांना रोख पारितोषिक,स्मृती चिन्ह,प्रमाणपत्र तसेच दोन कवितांना प्रोत्साहन पारितोषिक प्रदान करून याशिवाय प्रत्येक जिल्हातून एका उत्कृष्ट कवितेला सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह देण्यात आले.
यात कवयित्री हर्षा भुरे ह्या भंडारा जिल्हातून प्रथम पारितोषिकाच्या मानकरी ठरल्याने आयोजकांनी नुकतेच भंडारा जिल्हातून उत्कृष्ट कवयित्री म्हणून सन्मानित करण्यात आले.कवयित्री हर्षा भुरे ह्या उत्कृष्ट रांगोळीकार,संस्थापिका आणि लाडू काव्य निर्मातीकार असून विविध पुरस्काराने सन्मानित आहेत.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे.
- Advertisement -

