उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- चिमूर तालुक्यातील गोसेखुर्द कालव्यावर शंकरपूर पासून एक किलोमीटर अंतरावर गोसेखुर्द कालवा आहे.सदर कालव्यावर पूलाचे बांधकाम सुरू आहे.आज २७ मार्च रोजी सकाळी पुलाच्या कामाकरीता रेती भरलेला ट्रक ब्रम्हपुरीवरून निघाला होता.पुलाजवळील वळणमार्गावर चालकाचे संतुलन बिघडल्याने पूल तोडून ट्रक कालव्यात कोसळला. यात चालक दीपक इंद्रदीप वय २८ वर्षे व वाहक प्रताप शिवकुमार राऊत वय २६ या दोघांचा जागीच मृत्यू झाला.दोघेही उमरेड तालुक्यातील सुरगाव येथील रहिवासी होते.