चंद्रपूर :-तरुणाचे गावातीलच तरुणीशी सुत जुळले. दोघेही गावातून पळून गेले.त्यानुसार कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.पोलिसांनी दोघांनाही शोधून काढत मुलीला विचारणा केली असता तरुणाशी लग्न करण्यास संमती दर्शविली.लग्न तर केले,मात्र मुलीच्या घरासमोरूनच लग्नाची मिरवणूक काढत फटाके असतांना वादंग निर्माण झाल्याने दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी आणि काठ्यांनी मारहाण सुरू झाली. सदरची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील गांधीनगरमध्ये लग्नाच्या दिवशी म्हणजेच रविवारी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडली.प्रकरणी कोरपना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.गांधीनगरचा रवी बंडू बुटले यांचे त्याच गावातील १९ वर्षीय शिवानी राऊतशी प्रेमसंबंध होते.दोघेही बारा दिवसांपूर्वी गावातून पळून गेले होते.पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली तेव्हा पोलिसांनी दोघांनाही शोधून काढले.शिवानीने पोलिसांसमोर रवीशी लग्न करण्यास संमती दर्शविली आणि दोन दिवसांपूर्वी रविवारी त्यांचे लग्न झाले. परंतु,शिवानीच्या कुटुंबाला या लग्नाला मान्यता नव्हती आणि तिच्या कुटुंबातील एकही सदस्य लग्नाला उपस्थित नव्हता.लग्नानंतर सायंकाळी साडे सात वाजता शिवानीच्या घरासमोर लग्नाची मिरवणूक निघत होती.शिवानीच्या घरासमोर लग्नाच्या वेळी फटाके फोडले,नाचले आणि गाणी गायली तेव्हा शिवानीच्या कुटुंबाला राग आला आणि दोन्ही कुटूंबीयांमध्ये हाणामारी आणि काठ्यांनी मारहाण सुरू झाली.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.परंतु,दोन्ही कुटूंबीय ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने कोरपना पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
प्रेमविवाह केला आणि मुलीच्या घरासमोरूनच फटाके फोडत काढली लग्नाची मिरवणूक.. – वादंग निर्माण होऊन दोन कुटूंबीयांत हाणामारी..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

