Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरप्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी..

प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील हिरापुर टोल नाक्याजवळ चंद्रपूरवरून गडचिरोलीकडे  भरधाव वेगात निघालेली केजी एन नामक ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला पलटी झाली.यात ट्रॅव्हल्स मधील तब्बल ३५ ते ४० प्रवासी बसमध्येच अडकून पडल्याने अनेकजण जखमी झाले तर यातील काहीजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार २४ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली.
आज शनिवारी दुपारच्या सुमारास एमएच ३४ जीपी १७३६ क्रमांकाची खासगी बस ट्रॅव्हल्स चंद्रपूरवरून गडचिरोलीकडे भरधाव वेगात निघालेली असतांनाच सावली तालुक्याच्या हिरापुर टोल नाक्याजवळ येताच एका दुचाकीला वाचविण्याच्या नादात ट्रॅव्हल्स  चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत ट्रॅव्हल्सच्या आतमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढून सावली पोलीस प्रशासनास माहिती दिली.माहीती मिळताच सावली पोलिसांनी घटनास्थळ गाठून किरकोळ जखमींना सावली ग्रामीण रुग्णालयात भरती केले,तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अद्याप जखमींची नावे कळू शकली नाही.घटनास्थळी काहीकाळ नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!