Friday, June 19, 2026
Homeमुंबईप्रत्येक प्रकरण विनयभंगाचे नसते; आधी विनयभंग करण्याचा हेतू असला पाहिजे…-उच्च न्यायालयाने विनयभंगाची...

प्रत्येक प्रकरण विनयभंगाचे नसते; आधी विनयभंग करण्याचा हेतू असला पाहिजे…-उच्च न्यायालयाने विनयभंगाची मागणी फेटाळून लावली…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-भांडणाच्या वेळी महिलेचे केस ओढणे,तिला धक्काबुक्की करणे म्हणजे तिच्या विनयशीलतेचा अपमान करणे नाही; कारण त्यासाठी आधी विनयभंग करण्याचा हेतू असला पाहिजे,असे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने बागेश्वर बाबांच्या पाच अनुयायांना दिलासा दिला.

न्या.रेवती मोहिते डेरे व न्या.पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांचे पाच अनुयायी अभिजित करंजुळे,मयुरेश कुलकर्णी,ईश्वर गुंजाळ,अविनाश पांडे आणि लक्ष्मण पंत यांच्यावर आयपीसी कलम ३५४ लागू करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यास नकार दिला.

या पाचही जणांनी नितीन उपाध्याय यांना मारहाण केल्याचा आणि त्यांच्या पत्नीचे केस ओढून तिला धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.मात्र,उपाध्याय यांच्या पत्नीने तिला अयोग्य पद्धतीने हात लावण्यात आल्याचे आणि तिचा विनयभंग करण्याचा आरोपींचा हेतू होता,असे तक्रारीत म्हटलेले नाही.एखाद्या महिलेबरोबर भांडण झाले की केस ओढणे आणि धक्काबुक्की केली जाते; पण यामध्ये तिचा विनयभंग करण्याचा हेतू होता,हे स्पष्टपणे दाखवावे लागेल. असे प्रत्येक प्रकरण विनयभंगाचे नसते; असे न्यायालयाने स्पष्ट केले.

उपाध्याय यांच्या पत्नीने पोलिस जबाबात आरोपींनी आपल्याशी वाईट वर्तन केल्याचे म्हटले असून बलात्कार प्रकरणांत पीडिता सुरुवातीला आरोपीने ‘वाईट वर्तन’ केल्याचे सांगते.त्यानंतर आरोपीने काय-काय केले ते सांगते,असे यावेळी उपाध्याय यांची बाजू मांडताना त्यांचे वकील अनिकेत निकम यांनी न्यायालयाला सांगितले,मात्र,न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!