Monday, August 24, 2026
Homeचंद्रपूरपोलिसांची मोठी कारवाई.. दोन देशी कट्टे,दोन माऊझर गन,३५ जिवंत काडतुसे अन् चार...

पोलिसांची मोठी कारवाई.. दोन देशी कट्टे,दोन माऊझर गन,३५ जिवंत काडतुसे अन् चार खंजर सह चौघेजण ताब्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शहर पोलिसांनी ऐन दिवाळी सणाच्या  पूर्वसंध्येला मोठा डाव हाणून पाडत चार जणांना अटक करून दोन देशी कट्टे,दोन माऊझर गन,३५ जिवंत काडतुसे आणि चार लोखंडी खंजर असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.काल सोमवारच्या रात्री गंजवॉर्ड येथे केलेल्या या कारवाईत चंद्रेश उर्फ छोटू देसराज सूर्यवंशी, बोरीस श्रीनिवास कुसुमा, मुकेश राजू वर्मा ऊर्फ टंक्यू,अमित बाडकुराम सोनकर सर्व रा.बल्लारपूर या चौघांना अटक केली आहे.काल,सोमवार २० ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनचे डी.बी.पथकातील अधिकारी, अंमलदार रात्री गस्त घालत असतांना,रेकॉर्डवरील आरोपी छोटू सूर्यवंशी रा.बल्लारपूर आपल्या साथीदारांसह काळ्या रंगाच्या कारने गंजवार्ड येथील दादामिया ट्रान्सपोर्ट गॅरेजसमोर देशी कट्टा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारावर पोलिसांचे पथक रवाना झाले. दरम्यान,त्या ठिकाणी संशयास्पद हालचाल दिसताच पोलिसांनी तात्काळ घेराव घातला.त्यावेळी आठ जणांपैकी चार जण पळून गेले,तर चार जणांना पोलिसांनी शिताफीने पकडले.कारची झडती घेतली असता सीटच्या खाली दोन देशी कट्टे,दोन माऊझर गन,३५ जिवंत काडतुसे,चार लोखंडी खंजर व अन्य साहित्य असा मोठा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी शस्त्रासह एकूण १७ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास ठाणेदार निशिकांत रामटेके करीत आहेत.प्रकरणी शहर पोलिसांनी,भा.दं.वि.कलम ३१०(४)सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,४,२५ अंतर्गत गुन्हा नोंद केला असून फरार आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौघुले, ठाणेदार निशीकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवने,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे,विलास निकोडे,लक्ष्मण रामटेके,संजय धोटे,इम्रान शेख,सचिन बोरकर,निकेश ढेगे,रुपेश परते,जावेद सिद्दिकी यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

जोरदार पावसाचा फटका; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता.. – वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.अशा परिस्थितीत काल रविवारी झालेला पाऊस पिकांसाठी...

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!