Monday, August 24, 2026
Homeनागपूरफटाक्यांच्या आतषबाजीत आगीचा भडका..!

फटाक्यांच्या आतषबाजीत आगीचा भडका..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दिवाळीचा सण हा सर्वांसाठी द्विगुणित आनंद व्यक्त करणारा असून दिवाळी आणि लक्ष्मी पूजनाची जय्यत तयारी ही अनेकांसाठी मोठ्या पर्वाची आणि उत्सवाची मानली जाते.अश्याच प्रकारे काल मंगळवारी लक्ष्मी पूजन झाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या प्रियजन आणि कुटुंबियांसोबत फटाके फोडत असतात.अश्यातच दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या फटाक्यांमुळे नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये आगीच्या घटना घडल्या. विविध भागात ६ हून अधिक भागांत आगीचा भडका उडाला आहे.फटाक्यांमुळे लागलेल्या आगीमुळे बरेच नुकसान झाले आहे.नागपूर शहरातील जिओ स्मार्ट मार्केटमध्ये आग लागल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली.आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली.जिओ मार्टमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच नागपूर महानगर पालिकेचे अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल झाले.आग मोठी लागली असल्याने वाढत गेली.रात्रभर ६ अग्निशामक बंबच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.दरम्यान,जिओ मार्टमध्ये आग कश्यामुळे लागली,अद्याप स्पष्ट झाले नाही.धूर निघत असल्याचे एका कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले.त्यानंतर आगीने चांगलाच भडका घेतला.यासोबतच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे नागपूर शहराच्या विविध भागात तब्बल सहा घटना घडल्या आहेत.फटाक्यांच्या ठिणग्या कचरा व वाहनावर उडाल्याने अनेक ठिकाणची वाहने जळून खाक झालीत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जोरदार पावसाचा फटका; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता.. – वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.अशा परिस्थितीत काल रविवारी झालेला पाऊस पिकांसाठी...

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!