Thursday, October 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपुढील चार दिवस पावसाचे..!

पुढील चार दिवस पावसाचे..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम सुरू असतांनाच बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार,आज, मंगळवार २१ ऑक्टोंबरपासून पुढील २५ ऑक्टोंबरपर्यंत विविध जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आज,मंगळवार २१ ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर,गडचिरोली, लातूर,नांदेड,परभणी,हिंगोली,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,वाशिम,अकोला,यवतमाळ यांना पावसाचे यलो अलर्ट देण्यात आले आहे.तर उद्या,बुधवार २२ ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर,गडचिरोली, सांगली,कोल्हापूर,धाराशिव,लातूर,नांदेड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,बुलढाणा,सातारा,यवतमाळ यांना पावसाचे अलर्ट देण्यात आले आहे.तर २३ ऑक्टोंबर रोजी वर्धा, चंद्रपूर गोंदिया,गडचिरोली,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,धाराशिव, लातूर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,पुणे,सातारा,बीड,नांदेड, वाशिम,यवतमाळ या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आले आहे.तर २४ ऑक्टोंबर रोजी वर्धा,नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली,बीड,धाराशिव,लातूर,अकोला,अमरावती, यवतमाळ,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,कोल्हापूर, सांगली,सातारा,पुणे,नगर,सोलापूर,नांदेड,वाशिम, बुलढाणा यांना अलर्ट देण्यात आला आहे.तसेच २५ ऑक्टोंबर रोजी सातारा,सांगली,सोलापूर,नगर,छत्रपती संभाजीनगर,बीड,धाराशिव,रायगड, रत्नागिरी,पुणे सह संपूर्ण विदर्भात पावसाच्या धारा कोसळणार आहेत.ऐन सणासुदीच्या काळात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन केंद्रे सक्रिय केली असून, पूरनियंत्रण यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिने सृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन.. – ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’...

उद्रेक न्युज वृत्त :-ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले.गोव्यातील डोना पौला येथील...

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!