उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- शहरात विना परवानगी भित्तीपत्रके लावणाऱ्या नवशक्ती आयुर्वेदीक दवाखानाविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र.एक कार्यालयाद्वारे शुक्रवारी शहर पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शहरातील जटपुरा गेट तसेच छोटा बाजार चौक रोड परिसरातील भिंतींवर,विविध शासकीय व खाजगी परिसरात नवशक्ती आयुर्वेदीक दवाखान्याची जाहिरात करणारे स्टीकर्स,भिंतीपत्रके मनपाकडून पूर्वपरवानगी न घेता लावले असल्याचे,सहाय्यक आयुक्त यांना बुधवारी दि.२६ जून रोजी पाहणीदरम्यान आढळुन आले.संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले होते.मात्र भिंतीपत्रके न काढल्याने नवशक्ती आयुर्वेदीक दवाखाना यांच्यावर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा अंतर्गत फौजदारी गुन्हा
नोंद करण्यात यावा; अश्या आशयाची तक्रार करण्यात आली.जाहिरात करण्यास अश्या प्रकारचा अवलंब केल्याने शासकीय निधीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.तसेच शहर सुशोभीकरणाच्या कामातही बाधा निर्माण होते.विना परवाना पत्रके लावल्याने झालेल्या तक्ररीची माहिती होताच शहरात एकच खळबळ उडाली आहे.आता पोलिस काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

