Sunday, August 9, 2026
Homeचंद्रपूरपिकअप वाहनाचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर १३ जखमी.. - आज...

पिकअप वाहनाचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर १३ जखमी.. – आज सकाळच्या घटनेने हळहळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील नांदगाव येथे आज,बुधवार २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडून अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला,तर १२ जणांना किरकोळ दुखापत होऊन एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.अपघातात हरिदास मिटपल्लीवार वय ३५ वर्षे,रा.नांदगाव,ता.मूल,जि.चंद्रपूर व वनिता भिकारू मरसकोल्हे वय ४० वर्षे,रा.डोंगर(हळदी)यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार,तेलंगणा राज्यातून रोवणी करून परत येत असतांना मजुरांनी भरलेल्या पिकअप वाहनाने मूल तालुक्याच्या नांदगाव येथील लक्की बार जवळ आज सकाळी साडे सहाच्या सुमारास शौचासाठी बाहेर पडलेल्या हरिदास मिटपल्लीवार यांना रस्ता ओलांडत असतांना जोरदार धडक दिली.यात हरिदास यांचा जागीच मृत्यू झाला.अश्यातच हरिदास यांना धडक दिल्याने पिकअप वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले.यात पिकअप वाहनातील वनिता मरसकोल्हे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर १३ मजूर जखमी झाले. यातील एक महिला मजूर गंभीर जखमी झाली.घटनेची माहिती मूल पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत जखमींना मूल उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.तर यातील गंभीर जखमी महिलेस चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर ठिकाणाहून परत येतांना गोर-गरिबांवर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेचा पुढील तपास मूल पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!