Monday, April 27, 2026
Homeभंडारापाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग.. - यंत्रणांना...

पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग.. – यंत्रणांना अलर्ट राहण्याचे निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीतील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ४० क्युमेक्स पाणी(४० हजार लिटर प्रति सेकंद)सोडण्यात आले असून धरणात येणाऱ्या पाण्याच्या येव्यानुसार सदरचे विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी अधिक करण्यात येणार आहे.पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने नदीकाठावर किंवा नदीपात्रात ये-जा करणाऱ्या नागरिकांनी,मच्छिमारांनी तसेच पशुपालकांनी दक्षता घ्यावी,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान, कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी नागरिकांनी नदी क्षेत्रापासून दूर राहावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.यासोबतच संबंधित यंत्रणांना अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने आपापल्या स्तरावर आवश्यक ती खबरदारी घ्यावी व सदरची माहिती तातडीने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावी,असेही प्रशासनाने नमूद केले आहे.प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून,गरज भासल्यास पाणी विसर्जनाच्या प्रमाणात बदल केला जाईल.नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व फक्त प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे,असेही प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!