Tuesday, June 9, 2026
Homeभंडारासर्वसामान्य नागरिकांच्या कष्टाच्या पुंजीवर डल्ला; पतसंस्थेचे पदाधिकारी शाखा बंद करून झाले पसार..

सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टाच्या पुंजीवर डल्ला; पतसंस्थेचे पदाधिकारी शाखा बंद करून झाले पसार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-पतसंस्थेच्या आकर्षक योजनांना व आमिषाला बळी पडून शेतकरी,शेतमजूर,छोटे दुकानदार आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई पतसंस्थेत गुंतवली.मुदत पूर्ण झाल्यावर जेव्हा ग्राहक पैसे मागण्यासाठी गेले,तेव्हा सुरुवातीला त्यांना केवळ आश्वासने देण्यात आली.मात्र,अचानक सर्व शाखांना टाळे लावून आणि कार्यालये रिकामी करून पदाधिकारी पसार झाल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे.अल्पकाळात दामदुपटीचे आणि जादा व्याजाचे आमिष दाखवून सर्वसामान्यांच्या कष्टाची पुंजी जमा करणाऱ्या ‘लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, लाखनी’ या संस्थेने हजारो नागरिकांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मुदत संपूनही ठेवी परत न मिळाल्याने आणि पतसंस्थेचे पदाधिकारी सर्व शाखा बंद करून पसार झाल्याने संतप्त ग्राहकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तक्रार नोंदवली.
सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सावन कुमार यांना दिलेल्या निवेदनात,दोषी पदाधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची आणि मालमत्ता जप्त करून नागरिकांचे पैसे परत मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी सचिन गेडाम,मनोज खोब्रागडे, मदनपाल गोस्वामी,मोरेश्वर गजभिये,अमित वैद्य,राहुल श्यामकुबर,कपिला रामटेके,मंजू गजभिये यांच्यासह चरणदास कान्हेकर,दुधराम नगरकर,ललिता शेंडे आणि अजय लाडे यांसारखे शेकडो पीडित नागरिक उपस्थित होते.विशेष म्हणजे,कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीचे मोठे ‘टार्गेट’ देऊन त्यांनी आपल्या नातेवाइकांच्याही ठेवी ठेवण्यास भाग पाडले होते.फसवणुकीच्या प्रकरणांमुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,लाखनी’ या पतसंस्थेच्या साकोली,सानगडी, एकोडी-किन्ही,लाखनी, पोहरा,सालेभाटा,पालांदूर,मुरमाडी-तुपकर आणि पिंपळगाव सडक अशा नऊ ठिकाणी शाखा होत्या.या सर्व शाखांमधून सुमारे वीस ते २५ कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.केवळ पोहरा शाखेतूनच दीड ते दोन कोटींची अफरातफर झाल्याची प्राथमिक भीती पीडितांनी व्यक्त केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!