Sunday, October 4, 2026
Homeकुरखेडाखेडेगावच्या जंगलात जुगाराचा डाव; अड्ड्यावर पोलीसांची धाड.. - तब्बल २२ आरोपींना अटक...

खेडेगावच्या जंगलात जुगाराचा डाव; अड्ड्यावर पोलीसांची धाड.. – तब्बल २२ आरोपींना अटक करून ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील
खेडेगावच्या जंगलात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री ते आज मंगळवारी पहाटेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन कुरखेडा यांच्या संयुक्त पथकाद्वारे टाकण्यात आलेल्या धाडीत जुगार खेळणाऱ्या तब्बल २२ आरोपींना अटक करून ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कुरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खेडेगाव येथील निर्जन जंगलात रात्रीच्या सुमारास अड्डा भरवत मोठ्या प्रमाणात जुगार खेळविण्यात येत असल्याच्या गोपनीय माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन कुरखेडा येथील संयुक्त पथकाने योजनाबद्धरीत्या मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास धाड टाकली.यावेळी घटनास्थळी ५२ ताश पत्त्याच्या  साहाय्याने पैशाची शर्यत लावत अवैधपणे जुगार खेळवितांना मुख्य आरोपी एजाज शेख(कात्या)सह २२ आरोपी आढळून आले. प्रकरणी त्यांच्या विरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गून्हा दाखल करून  अटक करण्यात आली आहे.तसेच घटणास्थळावरून २ लाख ७५ हजार २०० रूपये रोख, जुगार खेळण्याचे पत्ते,२३ जूने वापरते मोबाइल,१३ चारचाकी वाहने,६ दुचाकी असा ७१ लाख ८५ हजार ३३० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनात कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण फेगडे,कुरखेडाचे ठाणेदार महेंद्र वाघ,स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगतसिंग दूल्हत तसेच स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन कुरखेडा येथील संयुक्त पथकाद्वारे करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!