Saturday, October 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून दिले जाते.महत्वाचे म्हणजे,लग्नाच्या पत्रिकेत वयाचा उल्लेख नसल्याने कोणालाही संशय येत नाही.पण,लग्नपत्रिकेवर जन्मतारीख असल्यास वयाचा पुरावा सार्वजनिक होतो. जर कोणाला बालविवाह होत असल्याचे संशय आला,तर लग्न पत्रिकेवरील तारखेच्या आधारे तक्रार करणे सोपे होईल.यासाठीच राज्यातील बालविवाहाची कुप्रथा समूळ नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने महत्त्वाचे उचलले आहे.यापुढे लग्न करायचे असेल तर लग्नाच्या पत्रिकेवर वर आणि वधू या दोघांचीही जन्मतारीख छापणे अनिवार्य असावे,अशी शिफारस महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने राज्य सरकारला केली आहे.या निर्णयामुळे वयाची अट पूर्ण न होता होणारे विवाह रोखण्यास मोठी मदत होणार आहे.आयोगाने गृह विभाग आणि महिला व बालविकास विभागाला दिलेल्या शिफारसीनुसार,लग्नपत्रिकेवर मुलगा (वर)आणि मुलगी(वधू)यांच्या नावाखाली त्यांच्या जन्मतारखेचा उल्लेख स्पष्टपणे असावा.लग्नपत्रिका छापण्यापूर्वी प्रिंटिंग प्रेस मालकांनी वर-वधूच्या आधार कार्ड किंवा जन्म दाखल्याची पडताळणी करणे आवश्यक असेल.आयोगाच्या या शिफारसीमध्ये केवळ कुटुंबावरच नाही,तर व्यावसायिकांवरही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.एखाद्या प्रिंटिंग प्रेसने वयाची खातरजमा न करता पत्रिका छापली किंवा मंगल कार्यालयाने अल्पवयीन मुला-मुलीचे लग्न लावून दिले,तर त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.विवाह नोंदणी करताना पत्रिकेवरील जन्मतारीख आणि अधिकृत कागदपत्रे यांची खातरजमा केली जाईल.विशेष म्हणजे,बालविवाहाला सुरुवातीलाच चाप लावण्यासाठी आयोगाने राज्य सरकारला ‘राजस्थान पॅटर्न’ राबवण्याची शिफारस केली आहे.राजस्थानमध्ये लग्नपत्रिकेवर वर आणि वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक आहे,ज्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.तोच नियम महाराष्ट्रात लागू करावा. यासाठी ही शिफारस करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!