Sunday, June 21, 2026
Homeभंडारापाच दिवसांपासून बेपत्ता जवानाचा थांगपत्ता लागेना..!

पाच दिवसांपासून बेपत्ता जवानाचा थांगपत्ता लागेना..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-पाच दिवसांपासून रेल्वे प्रवासादरम्यान
बेपत्ता झालेल्या जवानाचा थांगपत्ता लागेनासा झाल्याने भारतीय सेनेचे अधिकारी,पत्नी तथा कुटुंबीयांची चिंता वाढलेली आहे.११ डिसेंबर २०२४ ला या जवानाचे लग्न झाले होते.भंडारा येथील गुड्डू मुकेश सिंग गौड वय २४ वर्षे हे भारतीय सेनेत असून सध्या ते लेह लद्दाख येथे कार्यरत आहेत.लग्न असल्याने ते सुट्टयांवर आले होते.११ डिसेंबर २०२४ ला दिल्ली येथे त्यांचे थाटात लग्न झाले.लग्नानंतर ते पत्नीसह भंडारा येथील घरी आले होते.सुट्टया संपल्याने परतीच्या प्रवासादरम्यान रात्री पत्नीसह भ्रमणध्वनीवर बोलत होते.आराम करायचे सांगून जवानाने फोन ठेवला व दुसऱ्या दिवशी दिल्लीला जाताच घरी फोन करण्याचे सांगितले.पण,दुसऱ्या दिवशी ते निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर पोहचलेच नाही.संपूर्ण प्रवासी खाली उतरून पुढच्या प्रवासाला गेले,पण गुड्डू यांचे सामान जसेच्यातसे डब्यात होते. प्रवासादरम्यान अचानक भारतीय सेनेचा जवान गायब झाल्याने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.घटनेचा तपास वरठी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीलेश गिरी करीत आहेत.पोलिसांचा तपास सुरू असून,भारतीय सेनेचे सर्व अधिकारी व त्यांची टीम यांसह रेल्वे पोलिस लक्ष ठेवून आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!