- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-पती-पत्नीमध्ये भांडण होतच असतात. संसार म्हटले तर कधी सुख तर कधी दुःख हे सर्वांनाच लागू आहे.मात्र,एखादेवेळी सुखी संसारात दुःखाने उडी घातली तर होत्याचे नव्हते झाले; असे अनेकदा आपण ऐकत असतो.मनातील राग हा सर्वात मोठा शत्रू मानला जातो; ज्याच्या मनावर ताबा तोच त्यावर अधिराज्य गाजवू शकतो; अन्यथा सुखी संसार अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही.असाच काहीसा प्रकार भंडारा शहरात बुधवारी उघडकीस आला आहे.क्षुल्लक घरगुती भांडण झाले आणि पत्नीने टोकाचे पाऊल उचलले.भांडणामुळे
एका २६ वर्षीय विवाहितेने खोलीतील सिलिंग फॅनला गळफास घेवून आत्महत्या केली.गौरी श्वेतकुमार पांडे रा.शिक्षक कॉलनी,तकीया वॉर्ड,भंडारा असे मृत विवाहितेचे नाव आहे.
माहिती अशी की,श्वेतकुमार पांडे हे पत्नीसह शिक्षक कॉलनी येथील सुभाष गोंडाने यांच्याकडे राहतात. बुधवारला श्वेतकुमार व त्यांची पत्नी गौरी यांच्यात घरगुती कारणावरून भांडण झाले.यावरून श्वेतकुमार हा तक्रार देण्याकरीता भंडारा पोलिस ठाण्यात गेला.
दिलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी श्वेतकुमार पोलिसांसोबत घरी आले.तेव्हा गौरी ही बेडरूममधील सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला.पांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम १९४, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत मर्ग दाखल केला आहे.घरगुती भांडणादरम्यान पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला गेल्यानंतर गौरीने टोकाचे पाऊल का उचचले, नेमक्या कोणत्या कारणावरून वाद वाढला याचा तपास पोलिस घेत आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक चोरकर करीत आहे.
- Advertisement -