Tuesday, October 6, 2026
Homeनागपूरलाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा.. - डिसेंबरचे पैसे लवकरच मिळणार...

लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा.. – डिसेंबरचे पैसे लवकरच मिळणार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रत्येकी दीड हजार रुपये पात्र महीलांच्या खात्यात जमा झाले आहेत.आता सरकारच्या नव्या कार्यकाळात पुढील हफ्ता कधी जमा होणार? याबद्दल बहि‍णींना उत्सुकता लागली आहे.हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकार काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अशातच आज,गुरुवारी १९ डिसेंबरला विधानसभेच्या सत्रात बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.फडणवीस म्हणाले की,आमची एकही योजना बंद होणार नाही.लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे.अधिवेशन संपताच सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत.तर पुढे फडणवीसांनी अर्जदारांनाही आश्वासित केले आहे. ‘आम्ही जी आश्वासने दिली,ती आम्ही पूर्ण करणार आहोत.याबद्दल कुणीही शंका ठेऊ नये.योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीत.ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देणार आहोत.’ असेही फडणवीसांनी नमूद केले.
महायुतील निवडणुकीच्या जाहीरनाम्यात बहिणींना २१०० देण्याचे आश्वासन दिले होते.तर आता लाडक्या बहिणींचा पुढील हफ्ता २१०० चा असेल की १५०० चा याकडे बहिणींचे लक्ष लागले आहे.यावर फडणवीस म्हणाले,बहिणींना अर्थसंकल्पानंतर २१०० मिळू शकतील.डिसेंबरच्या हप्त्यामध्ये मात्र,आधीप्रमाणेच १५०० रुपये मिळणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नितेश कराळे मास्तरांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक,सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भातील वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात नितेश...

मतदार यादी पुनरीक्षण; आता बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना सुनावणीची नोटीस प्राप्त झाली असली,तरी निवडणूक...

बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावून नये; जीवाचे बरे वाईट केल्यास यंत्रणेला जबाबदार धरले जाईल- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जवसुलीपासून दिलासा देण्यात आला आहे.अश्यातच काही बँका,पतसंस्था वा इतर वित्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी...

लोखंडी पाईपांच्या आड गांजाची तस्करी; तिघांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-लोखंडी पाईपांच्या आड लपवून आणलेला तब्बल ५०० किलो गांजाचा साठा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एनसीबी)नागपुरात जप्त केला.हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्कायलाइन ढाब्याजवळ पहाटेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!