- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-राहत्या घरामागील सांजवाडीतून प्रवेश करून गोठ्यात शिरून बांधलेल्या एकूण २० शेळ्यांपैकी एका बोकडावर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केले,तर एका शेळीला जखमी केल्याची घटना लाखनी तालुक्यातील किटाडी येथे शनिवारच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.यात पशुपालकाचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले.वनविभागाकडून नुकसान भरपाईची मागणी नुकसानग्रस्त पशुपालक गोकुळ भोयर यांनी केली आहे.सायंकाळी शेळ्या व बोकड चराई करून आल्यानंतर त्यांना गोठ्यात बांधले होते.
रात्री ११ वाजता गोठ्यातील शेळ्या जोरजोराने ओरडू लागल्याने पशुपालक गोकुळ भोयर यांची झोपमोड झाली.गोठ्याकडे जाऊन पाहिले असता,पट्टेदार वाघाने एका बोकडाचा फडशा पाडल्याचे तर,एका शेळीला जखमी केल्याचे दिसून आले कुटुंबीयांना जागे करून मोठ्या हिमतीने स्वतः हातात काठी घेऊन वाघाला हुसकावून लावले.मात्र,वाघ दूर पळून न जाता त्यांच्या गोठ्याशेजारीलच सांजवाडीत त्याने काही वेळ ठिय्या दिला.माहिती मिळताच गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी गोळा झाले.गावकऱ्यांनी आरडाओरड करून फटाके फोडताचा वाघाने धूम ठोकली.घटनास्थळी पट्टेदार वाघाचे पगमार्कही आढळून आले आहेत.
- Advertisement -