Tuesday, September 1, 2026
Homeभंडारानगरपरिषद निवडणूक भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ५०० रुपयांचा "शपथपत्र करारनामा".. - आतापर्यंत ९ उमेदवारांनी...

नगरपरिषद निवडणूक भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ५०० रुपयांचा “शपथपत्र करारनामा”.. – आतापर्यंत ९ उमेदवारांनी केली स्वाक्षरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-सध्या सर्वत्र भ्रष्टाचाराचे जाळे पसरले आहेत. जो-तो पैश्याच्या मागे धावून काम साधूपणा करू पाहत आहे.अनेकजण काम निसटले की,तू कोण अन् मी कोण?असे करून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करीत असल्याने जनतेला आता कळून आले आहे. यासाठी भंडारा जिल्ह्यातील साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांनी शक्कल लढवून चक्क ५०० रुपयाचा स्टॅम्प पेपरवरील “शपथपत्र करारनामा” संभाव्य उमेदवारांकडून लिहून घेण्याच्या मोहिमेस प्रारंभ केला आहे.५०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरील “शपथपत्र करारनामा” जिल्ह्यातच नव्हे तर सोशल मीडियामुळे राज्यभर गाजत आहे.भंडारा जिल्ह्याच्या साकोलीतील प्रभाग क्रमांक-१ मधील श्री हनुमान मंदिरातून सुरू झालेल्या या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला असून याला जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.विशेष म्हणजे,आतापर्यंत तब्बल ९ उमेदवारांनी करारनाम्यावर स्वाक्षरी केल्याची माहिती आहे.नगर परिषद निवडणुक
भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी व्हीआयपी ग्रुप,साकोली मीडिया ग्रुप व फ्रिडम युथ फाउंडेशने पुढाकार घेतला आहे.
  • काय लिहिले शपथपत्र करारनाम्यात👇
           • शपथपत्र करारनामा •
लिहून देणार :- सर्व भावी नगरसेवक,नगराध्यक्षा संभाव्य निवडून येणारे सर्व नाव व पत्ता.
लिहून घेणार :- समस्त प्रभागातील जागृत पुरूष, महिला व युवक जनता
मी/आम्ही या शपथपत्रावर लिहून देत आहे की,मी / आम्ही साकोली सेंदूरवाफा मधील प्रभाग क्रमांक.. मधून जर मी निवडून आलो.तर मी शपथ घेतो की,मी नगरसेवक झाल्यावर कोणतेही ठेकेदारी करणार नाही.नगरपरिषदेतील कोणत्याही कामांचे टेंडर घेणार घेणार नाही.त्यातून कमिशन टक्केवारी खाणार नाही. जनतेच्या विकासासाठी आलेल्या सर्व शासनाचा निधी हा पूर्ण एकही गैरव्यवहार न होता पारदर्शकपणे जनहितार्थ लावला जाईल.याची मी मी/आम्ही पूर्णपणे हमी घेतो.तसेच मी नगरपरिषदेत कोणताही भ्रष्टाचार,गैरव्यवहार अथवा अफरातफर झाली तर मी त्यात सहभागी होणार नाही.व त्याची तक्रार दाखल करून सर्व पुरावे हाती घेत साकोली पोलीस ठाणे येथे ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करणार.
मी/आम्ही हे शपथपत्र लिहून देतो की,मी/आम्ही संपूर्ण पारदर्शकता ठेवून साकोली सेंदूरवाफा शहरातील प्रत्येक प्रभागाचा कसा विकास होणार याकडे लक्ष देणार.त्यात कोणताही भ्रष्टाचार मी / आम्ही करणार नाही.नगरपरिषदेतील कोणतेही टेंडर, कंत्राट मी/आम्ही घेणार नाही.शासनाच्या निधीचा योग्य वापर करू.वरील लिहून दिलेले सर्व बाबींचे जर मी/आम्ही उल्लंघन केले व वरील कोणतेही बेकायदेशीर काम मी/आम्ही केले व हे जनतेला व शासनमान्य पत्रकारांना कळले तर,मी/आम्ही आमचा नगरसेवक,नगराध्यक्षा पदाचा तातडीने राजीनामा देणार व माझ्यावर गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येईल.करीता हे शपथपत्र करारनामा मी/आम्ही कुणाच्याही दबावात न येता स्वमर्जीने जनतेच्या हितासाठी लिहून देत आहे.
लिहून घेणार सर्व मतदार जागृत जनता
लिहून देणार सर्व भावी नगरसेवक / नगराध्यक्षा
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!