Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज नगर परिषद निवडणुक; प्रचाराच्या धुराळ्यात काँग्रेस पक्ष आघाडीवर..

देसाईगंज नगर परिषद निवडणुक; प्रचाराच्या धुराळ्यात काँग्रेस पक्ष आघाडीवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे.डोअर टू डोअर भेटी-गाठी,चालता-बोलता लक्ष असू द्या व नानाविध बोलबाला करून अनेकजण प्रचारात मग्न झाले आहेत.अश्यातच देसाईगंज नगर नारपिषद निवडणुक प्रचारात काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र आहे.शहरातील जनतेत  काँग्रेसबाबतचा कल जाणवतांना दिसून येतो आहे.काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क मोहीम, पदयात्रा व सभांद्वारे लोकांशी संवाद साधण्याचा जोरदार कार्यक्रम आखला आहे.पाणीटंचाई,रस्त्यांची दुरावस्था, घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटी तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत अडचणी यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन देत काँग्रेसने प्रचारात गती आणली आहे.दुसरीकडे,स्थानिक नागरिकांनी प्रलंबित विकास कामांबाबत नाराजी व्यक्त केली असून बदलाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. “यावेळी बदल हवा” असा सूर शहरात उमटत असल्याचे प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यातून जाणवत आहे.आगामी काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता असून विविध पक्षांतील स्पर्धा चुरशीची होणार आहे.मात्र, प्रारंभीच्या टप्प्यात तरी काँग्रेस पक्ष प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!