- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-शहराच्या लोकल ट्रेनने लटकून प्रवास करणे दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची घटना उघडकीस आली आहे.काही महिन्यांपूर्वीच मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्टेशन दरम्यान लोकल ट्रेनला लटकून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता.सदरची घटना ताजी असतांनाच लोकल ट्रेनने लटकून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांचा तोल जाऊन खाली कोसळताच एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास वसई-नायगाव रेल्वे स्थानकाच्या मधोमध घडली.यात प्रतीश बाळाराम भोले याचा दुर्दैवी मृत्यू झाला,तर नानासाहेब मदने,असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
आज सकाळच्या सुमारास विरार रेल्वे स्थानकातून सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी चर्चगेटकडे एक लोकल ट्रेन रवाना झाली.या लोकल ट्रेनमधून प्रतीश बाळाराम भोले आणि नानासाहेब मदने हे दोघेही दरवाज्यात उभे राहून प्रवास करत होते.दरवाज्यात उभे असतांनाच धावत्या गाडीतून दोघांचाही तोल गेल्याने खाली कोसळले.यात एकजण मृत पावला,तर एकजण गंभीर जखमी झाला.घटना घडताच रेल्वे स्थानकावरील नागरिकांनी धाव घेत गंभीर जखमी तरुणास तात्काळ नजिकच्या रुग्णालयात दाखल केले.अपघातामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. अपघात प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
- Advertisement -

