Friday, September 25, 2026
Homeदेसाईगंजधान पीक कापणी करताना शेतकऱ्याचा अचानक मृत्यू…-देसाईगंज तालुक्याच्या अरततोंडी येथील घटना..

धान पीक कापणी करताना शेतकऱ्याचा अचानक मृत्यू…-देसाईगंज तालुक्याच्या अरततोंडी येथील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील अरततोंडी (जुनी) येथे उन्हाळी धान पीक कापणी करताना एका शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर आघात झाला आहे.ही घटना काल, १९ मे रोजी सकाळी साडेसात वाजता घडली.

चंद्रसेन धांडे वय ५० वर्षे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.ते मूळचे चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) गावचे असून त्यांची शेती अरततोंडीत आहे.जेमतेम दोन एकर जमिनीत धान पीक घेऊन ते उदरनिर्वाह करीत होते.काल,१९ मे रोजी सकाळीच ते पत्नीसमवेत धान काढण्यासाठी शेतावर गेले होते. धान कापणी करत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली.ते जमिनीवर कोसळले अन् क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान,कुटुंबियांनी त्यांना तातडीने दवाखान्यात नेले पण तोपर्यंत उशीर झाला होता.मृत्यूचे नेमके कारण कळले नसले तरी तीव्र हृदयविकाराचा झटका किंवा उष्माघाताने मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.देसाईगंज पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. दुपारी ४ वाजता त्यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.चंद्रसेन धांडे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने पत्नी व मुलांचा आधार हरवला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!