उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आजही हजारो लोक रस्त्यांवर,फुटपाथ किंवा उघड्यावर राहत आहेत.दोन वेळच्या अन्नाची कशीतरी सोय करणाऱ्या या लोकांकडे घर भाड्यानेही घेण्याची परिस्थिती नाही.अशा हजारो लोकांचा विचार करणारा निर्णय मुंबई हायकोर्टाने आज ३ मार्च रोजी दिला.दक्षिण मुंबईतील फूटपाथवर राहणाऱ्या रहिवाशांना हटवण्याचे निर्देश देणारा कोणताही आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.लोकांचे बेघर होणे ही जागतिक समस्या असून फूटपाथवर राहणारे लोकही इतर लोकांप्रमाणेच माणुस असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.शहरातील फूटपाथ आणि पदपथांवर अनधिकृत विक्रेते आणि फेरीवाले यांचा कब्जा असल्याच्या मुद्द्यावर हायकोर्टाने दाखल केलेल्या सुओ मोटू याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
न्यायमूर्ती पटेल म्हणाले, “ते (बेघर लोक) देखील माणसं आहेत. ते गरीब किंवा कमी भाग्यवान असू शकतात,परंतु ते देखील माणसे आहेत आणि ते न्यायालयाच्या दृष्टीने इतर माणसांप्रमाणेच मानव आहेत.” फूटपाथ आणि रुळांवर राहणाऱ्या अशा व्यक्तींसाठी रात्रीच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी सूचना असोसिएशनचे वकील मिलिंद साठे यांनी केली.हा एक उपाय आहे.ज्याचा अधिकारी विचार करू शकतात,असे खंडपीठाने म्हटले आहे.
दोन वेळच्या अन्नाची कशीतरी सोय करतात; तेही माणसच आहेत…मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; फुटपाथ वर राहणाऱ्या लोकांना दिलासा
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक