Sunday, August 30, 2026
Homeकुरखेडागोठ्यात बांधलेल्या गायीवर वाघाने चढविला हल्ला- कुरखेडा तालुक्यातील आंधळी- नवरगाव येथील घटना

गोठ्यात बांधलेल्या गायीवर वाघाने चढविला हल्ला- कुरखेडा तालुक्यातील आंधळी- नवरगाव येथील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा :- तालुक्यातीलआंधळी-नवरगाव येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या गायीवर वाघाने हल्ला चढविल्याचे प्रत्यक्षदर्शी गावातील नागरिकांनी बघितले असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील खरमतटोला,अरततोंडी व आंधळी-नवरगाव गावा नजिक संपूर्ण आजूबाजूचा परिसर जंगल व्याप्त असल्याने वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.आंधळी-नवरगाव शेतकरी येथील प्रकाश कवाडकर हे नेहमीप्रमाणे पशुंना गोठ्यात बांधून रात्रीच्या सुमारास झोपी गेले होते.अशातच दरम्यान जंगलातून वाघाने थेट गावात प्रवेश करीत कवाडकर यांच्या गोठ्याच्या दिशेने मोर्चा वळविला. यावेळी वाघाने बांधलेल्या अवस्थेत असलेल्या गायीवर हल्ला चढविला.मात्र वाघापेक्षा मोठी असलेल्या गायीने प्रतिकार केला.दरम्यान घराशेजारच्या नागरिकांना याची चाहूल लागताच कवाडकर यांच्या गोठ्याकडे बघितले असताना वाघ व गायींमध्ये संघर्ष सुरू असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी व पशुपालक कवाडकर यांनी आरडाओरड केल्याने वाघ जंगलाच्या दिशेने पसार झाला.

गावातील नागरिकांच्या मते,काही दिवसांपासून वाघ गावामध्ये येत असल्याने जनावरांसह गावातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.त्याकरिता वन विभागाने वन्य जीव व मानवी संघर्ष टाळण्याकरिता वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा.अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!