Wednesday, June 24, 2026
Homeएटापल्लीपुन्नूर येथील पाण्याची समस्या मिटणार... -भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते नळ पाणी पुरवठा...

पुन्नूर येथील पाण्याची समस्या मिटणार… -भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते नळ पाणी पुरवठा कामाचे भूमिपूजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

एटापल्ली:- तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या पुन्नूर गावात पाण्याची समस्या मिटणार असून नुकतेच माजी जि.प.अध्यक्षा तथा सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते जल जीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी माजी सभापती बेबीताई नरोटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे एटापल्ली शहर अध्यक्षा पौर्णिमा श्रीरामवर,सचिव सुमन दुर्वा,येमली चे सरपंच ललिता मडावी,माजी नगरसेविका सगुणा कांदो, सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच पुन्नूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व  जीवनमान उंचाविण्यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे.या मिशन अंतर्गत दुर्गम भागातील पुन्नूर येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे.या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर असून या निधीतून पाईपलाईन,विहीर खोलीकरण,नवीन जलकुंभ बांधकाम व गावांतर्गत नव्याने पाईपलाईन करणे नळ कनेक्शन देणे इत्यादी कामे केली जाणार आहे.

पुन्नूर हे गाव कसनसूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असून याठिकाणी ४३ लाख ६४ हजार ३५९ रुपयांच्या निधीतून नळ पाणीपुरवठा योजनेचे काम होत असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!