- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत ‘वंदे मातरम’ ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झालीत.यानिमित्ताने राज्याच्या सांस्कृतिक खात्यातर्फे विविध शासकीय आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.हे गीत स्वातंत्र्य काळातील काळजाला ठेका चुकवणारे ठरले असून त्याचे महत्त्व भारतीय जनतेला नेहमीच प्रेरणा देणारे आहे.याच निमित्ताने आज शुक्रवारी इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंजच्या वतीने तथा तालुकास्तरीय वंदे मातरम समिती यांच्या समन्वयाने देसाईगंज आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण तथा प्रशिक्षण अधिकारी एस.एस.चौधरी यांच्या मार्गदर्शनातून १५० वा वंदे मातरम गौरव दिन म्हणून वंदे मातरम गीताचे सकाळी ९:५० वाजता सामूहिक गायन कार्यक्रम पार पडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष देसाईगंज तहसीलदार
प्रीती डूडुलकर,प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार अजय जगताप पोलीस,एपीआय संदीप आगरकर,गट विकास अधिकारी अशोक कुर्जेकर,आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे,आदर्श इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक दयाराम शिंगाडे ,वंदे मातरम कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते रोशन ठाकरे यांनी सर्व विद्यार्थीगण यांना वंदे मातरम विषयी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रीती डूडुलकर यांनी अध्यक्षीय भाषण केले.त्यानंतर वंदे मातरम गीतावर आधारित NSS स्वयंसेवक यांनी लघु नाटिका सादर करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रतीक्षा सहारे,प्रस्तावना सी.एम. गरमळे NSS समन्वयक व आभार प्रदर्शन श्री जे. टी.काटकर यांनी केले.सामूहिक वंदे मातरम गीत गायनासाठी देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालय, अनिकेत महाविद्यालय,महात्मा गांधी महाविद्यालय, मोहनसिनभाई जैवेरी कनिष्ठ महाविद्यालय,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,स्कायनेट स्कूल,जेजानी स्कूल,कुथे पाटील महाविद्यालय, युनिव्हर्सल स्कूल या सर्व शाळा, महाविद्यालयातील तब्बल ३,५०० विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम.एस.जाधव,ए.व्हि. तिजारे,गटनिदेशक व्हि.वाय.नागमोती,प्रभारी गटनिदेशक आणि तालुका स्तरिय समिती साहित्यिक इंजि.विजय मेश्राम,पत्रकार राजरतन मेश्राम,महिला गट प्रमुख कल्पना कापसे,अनुलोम संस्था जिल्हा प्रमुख अमित मोराडे सर्व समिती सदस्य व संस्थेतील शिक्षक वृंदांनी सहकार्य केले.
- Advertisement -

