उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- उन्हाळ्याच्या दिवसात अवकाळी पावसाचा कहर सुरू झाला आहे.अशातच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार देसाईगंज तालुक्यात आज १८ मार्च रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाला फटका बसणार आहे.देसाईगंज तालुक्यात सध्या काही भागात रब्बी पिकांची काढणी सुरू आहे.मात्र आज सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण व वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असल्याने काही शेतकऱ्यांचा शेतमाल शेतात काढून ठेवलेला असल्याने अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
तालुक्यातील कोंढाळा,कुरुड,शिवरजपुर,उसेगाव,फरी,झरी, किन्हाळा,मोहटोला व इतर परिसरातील शेतकरी बांधवांना पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तसेच काही पिके शेतात उभी असतांना पाऊस आल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढल्याचे दिसून येते.अशातच मोसमी थंडी वाऱ्यांमुळे व अवकाळी पावसामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.