Monday, September 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रॉशन कार्ड धारकांच्या खात्यात जमा होणार रोख रक्कम- प्रत्येक लाभार्थ्याला...

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रॉशन कार्ड धारकांच्या खात्यात जमा होणार रोख रक्कम- प्रत्येक लाभार्थ्याला १५० रुपये मिळणार रोख

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- केंद्र शासनाच्या सूचनेनुसार गरजू लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून वर्षभर मोफत अन्नधान्य देण्यात येत आहे.अशातच आता राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी रेशन कार्डधारकांना अन्नधान्य न देता त्यांच्या खात्यात रोख रक्कम देण्यात येणार आहे.राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला असून प्रत्येक लाभार्थ्याला १५० रुपये रोख मिळणार आहे.

राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित आहे. गेल्या काही काळापासून केंद्र शासनामार्फत राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणारा गहू आणि तांदूळ देण्यात येत नसल्याने लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे.आता प्रति माह प्रति लाभार्थी १५० रुपये इतकी रक्कम लाभार्थीच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.राज्यातील जवळपास १४ जिल्ह्यांत आत्महत्या ग्रस्तांचे प्रमाण जास्त आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!