Saturday, October 24, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यात अवकाळी पावसाने लावली हजेरी

देसाईगंज तालुक्यात अवकाळी पावसाने लावली हजेरी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- उन्हाळ्याच्या दिवसात अवकाळी पावसाचा कहर सुरू झाला आहे.अशातच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार देसाईगंज तालुक्यात आज १८ मार्च रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. 

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाला फटका बसणार आहे.देसाईगंज तालुक्यात सध्या काही भागात रब्बी पिकांची काढणी सुरू आहे.मात्र आज सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण व वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असल्याने काही शेतकऱ्यांचा शेतमाल शेतात काढून ठेवलेला असल्याने अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

तालुक्यातील कोंढाळा,कुरुड,शिवरजपुर,उसेगाव,फरी,झरी, किन्हाळा,मोहटोला व इतर परिसरातील शेतकरी बांधवांना पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तसेच काही पिके शेतात उभी असतांना पाऊस आल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढल्याचे दिसून येते.अशातच मोसमी थंडी वाऱ्यांमुळे व अवकाळी पावसामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत.. -अप्रमाणित संदेशांवर शेतकरी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये; जिल्हा परिषदेच्या संबंधित...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत तसेच ते जप्त करण्याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत, असा खुलासा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!