Thursday, June 25, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यातील वीज अटकाव यंत्रे झाली बिनकामी…

देसाईगंज तालुक्यातील वीज अटकाव यंत्रे झाली बिनकामी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- गडचिरोलीजिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायतींना मागील काही वर्षांपूर्वी शासनाच्या वतीने वीज अटकाव यंत्रांचे वाटप करण्यात आले होते.त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींनी गावामध्ये वीज अटकाव यंत्र लावले आहे.वीज अटकाव यंत्र तर लावण्यात आले; मात्र, लावण्यात आलेले वीज अटकाव यंत्र पडणाऱ्या विजेचा अटकावच करीत नसल्याने सदरचे यंत्र हे बिनकामी होऊन निष्क्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

अवकाळी पाऊस वा पावसाळ्यात शेतात काम करीत असलेले नागरिक,गावातील पान टपरीवर वा इतर ठिकाणी झाडाच्या आडोश्याला असलेले नागरिक,जनावरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या नागरिकांवर तसेच जनावरांवर वीज पडून ते मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.त्यामुळे अनेकांचे विजे पासून संरक्षण व्हावे; यासाठी वीज अटकाव यंत्रे लावण्यात आली.वीज अटकाव यंत्र लावल्यास पडणाऱ्या विजेपासून गावाचे संरक्षण करता येते.अशा यंत्रामुळे जवळपास दीड किलोमीटर अंतरावरील परिसराच्या आत वीज पडून कुठल्याही प्रकारची जीवितहानी टाळली जाते.वीज अटकाव यंत्र वीज पडण्यापासून थांबवू शकते.मात्र,देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या गावातील परिसरात लावण्यात आलेले वीज अटकाव यंत्र हे निकामी होऊन पाचशे मीटर अंतर तर सोडा गावात तसेच नजीकच्या परिसरात वीज पडून ‘जोर का झटका धिरेसे’ लागत असल्याने अनेकांची घाबरगुंडी होतांना दिसून येत आहे.अशातच लावलेली यंत्रे पडणाऱ्या विजेचा कशा प्रकारे अटकाव करून त्याची विल्हेवाट लावतेय हेच अनेकांना कळेनासे झाले आहे.लावण्यात आलेली वीज अटकाव यंत्रे सुरू आहेत की बंद अवस्थेत आहेत; हे कुणास ठाऊक,जसे चालतेय तसेच चालू द्या..! अशी अवस्था निर्माण झाली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून देखभाल,दुरुस्ती करण्यातच आली नसल्याने वीज अटकाव यंत्र ‘उभा व शोभा’ असे झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!