उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज :- शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हा प्रवक्ता विष्णू वैरागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ११ मे २०२३ ला दुपारच्या सुमारास देसाईगंज येथील पत्रकार,वार्ताहर यांची बैठक घेण्यात आली.सदर बैठकीत व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची देसाईगंज तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली.
बैठकीमध्ये देसाईगंज तालुका व्हाईस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी पुरुषोत्तम भागडकर, उपाध्यक्षपदी मोहम्मद आरिफ पटेल,सचिवपदी इलियास खान,सहसचिवपदी दिलीप कहुरके, कोषाध्यक्ष म्हणून हेमंत दुनेदार तर सदस्य पदी विष्णू वैरागडे,किशोर मेश्राम,जितेंद्र परसवानी,राजरतन मेश्राम,अब्दुल वहीद शेख,फिरोज लालानी,भरत दहलानी,तवंगर कुरेशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदर निवड करतेवेळी देसाईगंज येथील पत्रकार व वार्ताहर बांधव उपस्थित होते.