Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हात शिवसेनेला गत वैभव प्राप्त करून देणार....- जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपंचायत निवडणुकीत...

गडचिरोली जिल्हात शिवसेनेला गत वैभव प्राप्त करून देणार….- जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपंचायत निवडणुकीत भगवा फडकणार…..- शिवसेना संपर्क प्रमुख महेश केदारी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके 

कुरखेडा (गडचिरोली) :- आरमोरी विधानसभा क्षेत्रातील नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा सिंधी भवन कुरखेडा येथे पार पडला असून सदर मेळाव्याला नवनियुक्त संपर्क प्रमुख महेश केदारी यांनी मार्गदर्शन केले.मार्गदर्शन पर वक्तव्य करतांना त्यांनी म्हटले की,जिल्हात शिवसेना मजबूत होती. आजही जिल्ह्यामध्ये शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकरी गोरगरीब जनतेचे काम करून सुखदुःखात सहभागी होऊन जनतेला शिवसेनेशी नाते जुळवून आहेत. जनतेला शिवसेनेवर विश्वास आहे.शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केली व भाजपमध्ये गेले.परंतु जील्हातील शिवसैनिक यांच्या सोबतीला गेला नाही.याचा मला अभिमान आहे.मला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी गडचिरोली जिल्हात नियुक्ती केली आहे.येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद  निवडणुकीत भगवा फडकवल्या शिवाय गप्प बसणार नाही.जिल्हात शिवसैनिकांनी एकत्र येवून काम करावे  व पक्षाची ताकत वाढवावी;असे आव्हानही केले.

कार्यकर्ता मेळावा प्रसंगी आरमोरी विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप कदम यांनी म्हटले की,तालुक्या- तालुक्यात मेळावे आयोजन करून पक्ष संघटन मजबूत करू;त्यानंतर जील्हा प्रमुख सुरेंद्र सिह चंदेल यांनी मार्गदर्शन पर भाषणात म्हटले की,आरमोरी विधानसभा क्षेत्रात गावा-गावात नव्याने शिवसेनेची शाखा उघडुन पक्ष मजबूत करू तसेच येणाऱ्या प.स, जी.प.,नगर परिषद येथे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणू;अशी ग्वाही दिली.सह संपर्क प्रमुख अरविंद कात्राटवार यांनी म्हटले की, शिवसेनेतून चाळीस आमदार फुटून गेल्यावरही आमच्या जिल्हात काहीच फरक पडला नाही. तालुक्यात व प्रत्येक गावात संपर्क दौरे करून पक्षाची बाधणी करू शिवसैनिकांनी,पदाधीकाऱ्यांनी असे आव्हान केले.मेळावा प्रसंगी युवती सेना जिल्हाध्यक्षा उमा चंदेल, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम,नगराध्यक्ष अनिता बोरकर,उपजिल्हा प्रमुख महेंद्र मोहबंशी,महिला उप जिल्हा संघटीका वेणुताई ढवगाये,विभाग प्रमुख लोमेश कोटांगले यांची भाषणे झाली.

मेळाव्यात उपस्थित जिल्हा प्रमुख सुरेन्द्र सिंह चंदेल, सह संपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार,उपजिल्हा प्रमुख महेंद्र मोहबंशी,उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, महिला उप जिल्हा संघटीका वेणुताई ढवगाये,तालुका प्रमुख आशिष काळे,वडसा ता.प्र.नंदू चावला,माजी नगरसेवक पुंडलिक देशमुख,उप नगराध्यक्ष जयश्री रासेकर,माजी जी.प सदस्य दिगंबर मेश्राम,न.प. सभापती जयेंद्र चंदेल,सागर मने सभापती बांधकाम,  ॲड.चाट,पुरुषोत्तम तिरगम,राजेंद्र चोपडे,यादव लोहंबरे,लोमेश कोटांगले,मेघा मने,आरमोरी महिला ता.प्र.शारदा गाठडे,विजय पुस्तोडे,फुले उप सरपंच, शहर प्रमुख विकास प्रधान,अनिल उइके,आरमोरी ता. प्र.कवडू सहारे,ता.प्र.भूषण सातव,कोरची ता. प्र.डॉ. नरेश देशमुख,मुरुमगाव-सावरगाव क्षेत्र उप ता.प्र. कटिंगल,लहानु पिल्लारे,राजू ढोरे,कुरखेडा उप ता.प्र. गुणवंत दडमल,अजू सय्यद,महिला आघाडी राजकन्या नाकाडे,कांता बावनकर,सोनीबाई देविंद्र मेश्राम,शंकर कल्हारी,निकेश हेटकर आणि शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!