उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी क्लब देसाईगंजच्या वतीने देसाईगंज(वडसा) शहरात दोन दिवसीय भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिवजयंती महोत्सवास सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती शिवाजी क्लब देसाईगंजचे अध्यक्ष,आयोजक तथा ओबीसी संघटनेचे शहराध्यक्ष सागर वाढई यांनी केले आहे.
देसाईगंज छत्रपती शिवाजी क्लब सर्वांच्या सहकार्याने १९ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.१९ फेब्रुवारी २०२३ रोज रविवारला सायंकाळी ४.०० वाजेच्या सुमारास आरमोरी रोड,पोलीस स्टेशन समोरून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य-दिव्य मिरवणूक व पालखी सोहळा निघणार आहे.सदर मिरवणुकीचे दीप प्रज्वलन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या वतीने करण्यात येणार आहे.मिरवणुकीमध्ये विशेष आकर्षण म्हणून गोंडी नृत्य,शिवकालीन आखाडा,लाठीकाठी, तलवारबाजी,तायक्वांदो,दानपट्टा व लेझीम पथक यांचे आयोजन करण्यात आले आहे.२० फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास राजेंद्र वॉर्ड समाज भवनाच्या भव्य आवारात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना व शिवाजी महाराजांवर भव्य समाज प्रबोधन कार्यक्रम,सामूहिक प्रार्थना; त्यानंतर लगेच सामूहिक शिवभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून तरी कार्यक्रमास सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी; असे छत्रपती शिवाजी क्लब देसाईगंज(वडसा) यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.