Wednesday, June 10, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज गांधी वार्ड विविध समस्यांच्या विळख्यात- आम आदमी पक्षाने मुख्याधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे वेधले...

देसाईगंज गांधी वार्ड विविध समस्यांच्या विळख्यात- आम आदमी पक्षाने मुख्याधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष  

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज :- शहरातील गांधी वार्ड विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.नाली बांधकामे तर करण्यात आली.मात्र कित्तेक दिवसांपासून नाली सफाई करण्यात आली नाही.नाली सफाई बरोबरच चंद्रकांत बावनथडे गुरुजी यांच्या घरासमोरील परिसरात अजून पावेतो नालीवरती कव्हर बसवीण्यात आले नसल्याने काही दिवसांपूर्वीच लहान मुलगी खेळत असतांना नालीत पडली व तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.तसेच नालीवरती सिमेंट कव्हर लावण्यात आले नसल्याने परिसरात नालितील सांडपाणी व दूषित पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली आहे.अशातच रात्रौच्या सुमारास डास,किडे, मच्छर व इतर कीटकजन्य डासांच्या प्रादुर्भावाने वार्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.अशातच लहान मुले वा इतर वयोवृद्ध यांच्या बाबतीत दुर्घटना वारंवार घडू नये व नागरिकांच्या आरोग्याशी नगर परिषद देसाईगंज यांनी खेळू नये;याकरिता वार्डातील नाल्यांवरती कव्हर,नाली सफाई व इतर कामे त्वरित करावे; अशी मागणी देसाईगंज आम आदमी पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन सादर करतेवेळी आम आदमी पार्टीचे देसाईगंज तालुकाध्यक्ष भारत दयलानी,शहराध्यक्ष आशिष घुटके,दीपक नागदेवे,प्रमोद दहिवले,चंदू ठाकरे,अतुल ठाकरे,शेखर बारापात्रे,तबरेज भाई, नाजूक लुटे,वामन पगाडे,सिद्धार्थ गणवीर,बाळकृष्ण भांडारकर,केवळराम सिडाम,आशिष कोवे,सागर मेश्राम,सचिन बनारसे,देवा जांभूळकर,रेवनाथ झीलपे, जावेद शेख,पवन खोब्रागडे,तेजाराम ठाकरे,रुपेश राऊत,अनिकेत बावणे,मनीषा टेटे,आचल खोब्रागडे, प्रगती शेंडे,शिल्पा बोरकर,हेमलता तिरंगम,शबाना, संगीता बागडे व देसाईगंज आम आदमी पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!