- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पदस्पर्श भूमी (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिर)हनुमान वार्ड याठिकाणी देसाईगंज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत देसाईगंज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी गडचिरोली एस. एस.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष श्रम संस्कार शिबिर काल सोमवारपासून देसाईगंज शहराच्या हनुमान वार्ड येथे आयोजित करण्यात आले.
प्रसंगी आर.एम.गोतमारे गटनिर्देशक यांच्या अध्यक्षतेखाली,उद्घाटक शालूताई दंडवते माजी नगराध्यक्ष नगर परिषद देसाईगंज,प्रमुख अतिथी विनोद जक्कनवार सेवाअधिकारी,भाऊराव पत्रे सेवाअधिकारी, प्रकाश भैय्या गुरुदेव सेवा मंडळ गुरुदेवसेवक,विनोद फुलबांधे गुरुदेव सेवा मंडळ सचिव,रामकृष्ण सहारे गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष, देवराव दिघोरे सदस्य तथा सर्व समस्त गुरुदेव सेवा मंडळ हनुमान वार्ड देसाईगंज, शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,गाडगे महाराज,स्वामी विवेकानंद,छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला.शालूताई दंडवते तसेच विनोद जक्कनवार यांनी विशेष श्रम संस्कार शिबिराचे महत्व व एनएसएस स्वयंसेवकाचे कार्य या विषयावर मार्गदर्शन केले.सदर विशेष श्रम संस्कार शिबिरामध्ये परिसर स्वच्छता,वृक्ष लागवड,रंगरंगोटी,स्वच्छता अभियान,कलेचे सादरीकरण तसेच विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रतीक्षा सहारे एन एस एस स्वयंसेवक हिने केले तर प्रास्ताविक सी.एम. गरमळे एन एस एस समन्वयक यांनी केले.तर आभार प्रदर्शन व्ही.वाय.नागमोती एन एस एस सहसमन्वयक यांनी केले.सदर कार्यक्रमास गुणवंत वांढरे मुख्य लिपीक,राष्ट्रीय सेवा योजना समन्वय समिती सदस्य सी.डी.समर्थ,जे.टी.काटकर,आर.बी.भोयर,आर.सी. निखाडे व संस्थेतील सर्व कर्मचारीवृंद,एन एस एस स्वयंसेवक तथा ग्रामस्थ उपस्थित होते.
- Advertisement -