उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज :- तालुक्यातील शंकरपूर येथे कृषी तंत्रनिकेतन याठिकाणी २८ कृषी सखी यांची आज २६ मे रोजी एकदिवसीय प्रशिक्षण व कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी देसाईगंजचे निलेश गेडाम व विजय बर्डे उमेद यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाली.सदर प्रशिक्षण व कार्यशाळेत माती परीक्षण,पेरणीपूर्व मशागत,एकत्रित बी-बियाणे खरेदी,बिज-निवड,बिज प्रक्रिया,गादीवाफा तयार करणे,श्री पद्धती व सेंद्रिय औषधी तयार करणे व वापर करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक देशमुख,रहांगडाले (बीटीएमआत्मा), मंगेश वॉलदे (उमेद) यांनी केले. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक कोहडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी व्यवस्थापक उमेदच्या अश्विनी मेश्राम यांनीकेले.सदर प्रशिक्षण व कार्यशाळे प्रसंगी कृषी सहाय्यक कल्पना ठाकरे, दमकुंडवार,औरासे, उमेदचे कृषी व्यवस्थापक प्रशांत मंडपे व तालुक्यातील बहुसंख्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.