देसाईगंज :- आम आदमी पक्षाचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवनी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत देसाईगंज वार्ड क्रमांक-१ येथील लहान मुले व महिलांसमवेत १५ जानेवारी २०२३ रोजी मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने वार्डातील मुलांना पतंग व महिला माता भगिनींना साड्यांचे वाटप केल्याने वार्डातील आनंद द्विगुणीत झाले होते.आपच्या कार्यकर्त्यांनी मकरसंक्रांती निमित्ताने पतंग उडविण्याचा आस्वाद घेतला व वार्डातील समस्या जाणून घेतल्या.मकरसंक्रांती प्रसंगी देसाईगंज आम आदमी पक्षाचे दीपक नागदेवे,भरत दहलानी,तबरेज खान,समीर खान,जावेद शेख,शिल्पा बोरकर,प्रमोद दहीवले,चंदू ठाकरे,अतुल रामटेके,पिंकू आहूजा, राहुल बावने, वामन पगाडे,अशोक बोरकर,पटले जी व आपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.