उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- स्थानिक आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी सभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर कुकरेजा यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.यावेळी आदर्श महाविद्यालय माजी विद्यार्थी असोसिएशनचे सचिव एजाज खान आणि सहसचिव अशरफ खानानी,सदस्य ॲड.अतुल ऊईके,गुणवत्ता हमी कक्षाचे प्रभारी डॉ.एस जी गहाणे,माजी विद्यार्थी संघाचे संघटक प्रा.निहार बोदेले प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून विभिन्न कार्यक्रम व सोयी सुविधा यासंबंधी अनेक विषयावर चर्चा करण्यात आली व ठराव पारित करण्यात आले.सभेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल व त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी असलेले ऋणानुबंध कायम जोपासावेत असे आवाहन केले.यावेळी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील नवीन सोई सुविधा व नवीन अभ्यासक्रम,विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत अवगत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे संघटक प्रा.निहार बोदेले यांनी केले व मागील सभेचे इतिवृत्त उपस्थित करून मंजूर करून घेतले.उपस्थितांचे आभार प्रा.रमेश धोटे यांनी मानले.मेळाव्याला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,माजी विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.