उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- स्पर्धा परीक्षे बाबत विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर विद्यार्थी आत्मविश्वास व नियोजन पूर्ण तयारी करेल हीच स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी बाबत विद्यार्थी चुकीचा समज बाळगलेले असतात.जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा विचार करतो अर्धे यश त्या सकारात्मक विचारातच आहे.असे मौलिक विचार प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी व्यक्त केले ते आदर्श कला,वाणिज्य महाविद्यालयातील रोजगार मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा विभागाद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थांसाठी सुरु करण्यात आलेल्या “स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आर्थिक सहाय्यता योजनेच्या ” शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून मा. राजीव सिंग, संचालक, सिंग कोचीन क्लासेस, डॉ. जयदेव देशमुख, प्राध्यापक तथा वाणिज्य विभाग प्रमुख, प्रा. निहार बोदेले, प्रभारी, रोजगार मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा विभाग प्रामुख्याने उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा पुढे बोलतांना म्हणाले कि, स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना स्वयं-क्षमतेची जाणीव होते हि जाणीव व दृष्टीकोन त्यांना केवळ स्पर्धा परीक्षेतच नव्हे तर जीवनात यशस्वी बनविते ज्याचा समाजाला सुद्धा लाभ होतो. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. राजीव सिं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले कि, “स्पर्धा परीक्षे बाबत ची विद्यार्थ्यांमध्ये विनाकारणची भीती व नकारात्मकता असते. स्पर्धा परीक्षेत अनेक घटक आपण शिकलेले असतो ते केवळ आकलन स्तरावर अभ्यास करणे म्हणजे स्पर्धा परीक्षेची तरारी करणे होय . त्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनात विविधता आणावी” या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ. जयदेव देशमुख यांनी “स्पर्धा परीक्षा हि विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात आपले भविष्य घडविण्याची व समाजसेवा करण्याची संधी देते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे खर्या अर्थाने गावातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक व्यक्तिमत्व बनतात. अश्या विद्यार्थ्यांचा समाजावर प्रभाव असतो जे समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य करतात.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतुन रोजगार मार्गदर्शन विभागाचे प्रभारी प्रा.निहार बोदेले यांनी महाविद्यालय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सर्वोतोपरी मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचे व त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून हि योजना सुरु करण्यात आली असून या योजने अंतर्गत विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी,कोचिंग क्लासेस साठी आर्थिक सहाय्यता दिले जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अमोल बोरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.संजय परशुरामकर यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ.हितेंद्र धोटे, डॉ.चव्हाण,प्रा.रमेश धोटे,प्रा.सुभाष मेश्राम, प्रा.जयंत रामटेके आदी प्राध्यापक वृंद व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

