Monday, August 31, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न…

देसाईगंज आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-देसाईगंज आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला आहे.

महाविद्यालयातील फेब्रुवारी/मार्च २०२४ बोर्डाच्या परीक्षेत दहावी,बारावीत गुणवंत प्राप्त विद्यार्थांचे तसेच वयक्तिक विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थांचे नूतन शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंज येथील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकांचे शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला आहे.महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक विद्यार्थ्यांनी  अभ्यासाची कास धरून विशेष प्रावीण्य मिळविले पाहिजे.’यावे ज्ञानासाठी व निघावे सेवेसाठी’ असे प्रतिपादन समारंभ प्रकरणी आमदार कृष्णा गजबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सत्कार समारंभी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार कृष्णा गजबे,कार्यक्रमाचे अध्यक्ष  मोतिलाल कुकरेजा (सचिव नू.शि.प्र.मंडळ देसाईगंज) प्रमुख मार्गदर्शक तथा विशेष अतिथी मंगेश आरेवार (बिडीओ आरमोरी),प्रा.श्रीराम गहाणे (आ.क.वा.व वि.महा.देसाईगंज) तसेच जगदीश शर्मा(उपाध्यक्ष नू. शि.प्र.मंडळ देसाईगंज) मुरलीधरजी दुपारे(कोषाध्यक्ष नू.शि.प्र.मं.देसाईगंज), ओमप्रकाश अग्रवाल (सहसचिव नू.शि.प्र.मंडळ देसाईगंज),साधना सपाटे, अ.जाहिर अ.हमिद शेख,संतुमल डोडाणी,डॉ. इंदरप्रितसिंग टुटेजा,योगेश नाकतोडे, सोनल डी.घोरमोडे(सदस्य नू.शि.प्र.मंडळ देसाईगंज), जयदेव देशमुख (कार्य.प्राचार्य आ.क.वा.व वि.महा. देसाईगंज), शंकर कुकरेजा(माजी प्राचार्य आ.क.वा.व वि.महा. देसाईगंज), मुख्याध्यापक प्रा.डी.डी. शिंगाडे, उपमुख्याध्यापिका एस.पी.प्रधान, पर्यवेक्षिका डी.व्ही. चव्हाण, श्री.आर.बी.गायकवाड (गुणवंत विद्यार्थी सत्कार समिती आ.इं.हाय.तथा क.महा),हरीभाऊ पत्रे  (उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ) सुकेशिनी उके (सहसचिव  शिक्षक पालक संघ) तसेच हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी,हायस्कूल तथा कनिष्ठ महविद्यालचे माझी सेवानिवृत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यालयाचे विद्यार्थी सत्कार सामरंभला उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.पंकज धोटे आणि कु. माधुरी नाकाडे,कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डी.डी. शिंगाडे, प्रमुख मार्गदर्शन मंगेश आरेवार व प्रा.श्रीराम गहाणे,अध्यक्षीय मार्गदर्शन मोतिलाल कुकरेजा यांनी केले तर आभार रेशिम गायकवाड़ यांनी मानले. कार्यक्रमची सांगता राष्ट्रवंदन घेऊन करण्यात आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!