Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेत रंजना चुधरी विजयी…-नाट्यश्री चे २७ वे सत्र नुकतेच संपन्न…

गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेत रंजना चुधरी विजयी…-नाट्यश्री चे २७ वे सत्र नुकतेच संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.उपक्रमाचे २७ वे सत्र नुकतेच पार पडले असून यात २७ कवींनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवी रंजना रेमाजी चुधरी यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “नक्षत्राची छाया” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

रंजना रेमाजी चुधरी हे गडचिरोली येथील रहिवासी असून नवोदित कवी आहेत.त्यांना भजन व गाण्याचा विशेष छंद आहे.अनेक गीत  व कवितांचे  लेखन त्यांनी केलेले आहे.अनेक वृत्तपत्रांतून त्याच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम, प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सत्ताविसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने अतुल काशिनाथ गंडाटे,नरेंद्र गुंडेली,डॉ.चंद्रकांत लेनगुरे,  उपेंद्र रोहनकर,प्रिती ईश्वर चहांदे,पी.डी.काटकर, जयराम धोंगडे,वंदना सोरते,रोहिणी पराडकर,प्रियंका वाकडे,रेखा दिक्षित,डॉ.देवेंद्र मुनघाटे,सोनाली रायपुरे,  संगीता ठलाल,डॉ.मंदा पडवेकर,भिमानंद मेश्राम, ज्योती म्हस्के,तुळशीराम उंदीरवाडे,मुरलीधर खोटेले,  पुरुषोत्तम ठाकरे,गजानन गेडाम,रंजना चुधरी,गणेश रामदास निकम,विलास जेंगठे,मिलींद खोब्रागडे, सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

सत्रातील पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे चुडाराम बल्हारपुरे (नाटककार) यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!