Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा भरदिवसा गोळीबार..-तीन अज्ञात हल्लेखोरांनी केला हल्ला; दुकानातील कर्मचाऱ्याच्या...

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा भरदिवसा गोळीबार..-तीन अज्ञात हल्लेखोरांनी केला हल्ला; दुकानातील कर्मचाऱ्याच्या पायाला लागली गोळी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.आज,रविवारी ७ जुलै रोजी सकाळी वस्त्र भांडारमध्ये आधी बॉम्ब फेकण्यात आला.त्यानंतर दुकानात प्रवेश करत गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे.यामध्ये दुकानातील एक कर्मचारी जखमी झाले आहेत.तीन अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला आहे.हल्लेखोर चेहरा झाकून आले होते.

हल्लेखोरांकडून गोळीबार झाला तेव्हा एक गोळी या कर्मचाऱ्याच्या पायाला लागली आहे.कार्तिक साखरकर असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.चंद्रपूर शहरात गुरुवारी भरदुपारी एका अज्ञात इसमाने मनसे कामगारसेनेचा जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली होती.ही घटना ताजी असतांनाच असा प्रकार घडल्याने बल्लारपूर शहरात झालेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,गांधी चौक परिसरात मोतीलाल मालू वस्त्र भांडार आहे.सकाळी दुकान उघडल्यानंतर काही वेळाने हा हल्ला झाला. याविरोधात व्यापाऱ्यांनी सध्या बल्लारपूर शहरातील व्यापाऱ्यांनी बंदची हाक पुकारली आहे.दरम्यान, २ वर्षांपूर्वी मालू वस्त्र भांडार दुकानाला आग लावण्यात आली होती.त्यावेळी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र त्या आरोपीवर पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही.

तसेच या महिन्यात दुकानाचे मालक सुनील मालू यांना काही अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला होता.यामुळे सततच्या घटना पाहता मालू कुटुंबाने पोलिसांना सुरक्षेची मागणी केली होती.मात्र त्यांना सुरक्षा न मिळाळ्याने हल्लेखोरांची हिंमत वाढली असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी बल्लारपूर पोलिस तपास करीत आहे.

दरम्यान, दुकानात काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शी महेंद्र खोब्रागडे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार,तीन जण आले.त्यांनी बंदूक काढली होती.गोळीबार केला तेव्हा माझ्या सहकाऱ्याला गोळी लागली.तसेच तोडफोड केल्याचा आवाज आल्याने मी बाहेर गेलो.तेव्हा गाडीतून ३ जण आले होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!