Tuesday, April 21, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या तुळशी येथील युवा व्याख्याते साहिल रामटेके उद्याला धडकणार टीव्ही चॅनेलवर..

देसाईगंजच्या तुळशी येथील युवा व्याख्याते साहिल रामटेके उद्याला धडकणार टीव्ही चॅनेलवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या तुळशी या गावचे मूळ रहिवासी असलेले ज्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर आपली ओळख केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण केली,असे सुप्रसिद्ध युवा व्याख्याते साहिल साक्षकार रामटेके हे आता थेट टीव्हीवर धडकणार आहेत.गत वर्षी बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते अभिषेक बच्चन यांच्या “युवक बिरादरी भारत” या संस्थेचा मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय युवा भूषण पुरस्कार साहिल रामटेके यांनी पटकावला होता आणि त्यामुळे ते अधिक चर्चेत होते.अश्यातच उद्या,गुरुवार ५ मार्च रोजी राजकुमार बडोले फाउंडेशन तथा लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत बुद्ध फुले-शाहू-आंबेडकर सम्यक विहार नवेगाव,गडचिरोली येथे लाईव्ह महाचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.या महाचर्चेत युजीसी (UGC)बिल २०२६ शिक्षा में समानता या साजिश? या महत्त्वाच्या ज्वलंत मुद्द्यावर महाचर्चा होणार असून जिल्ह्यातील होतकरू आणि अभ्यासू असलेल्या व्यक्तींची या ठिकाणी निवड झालेली आहे.ज्यामध्ये तुळशी गावचे सुपुत्र साहिल साक्षकार रामटेके हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.प्रबोधन क्षेत्रात साहिल रामटेके यांचे योगदान अतुलनीय असून राष्ट्रीय युवा भूषण पुरस्कार, उत्कृष्ट वक्ता पुरस्कार,समाजरत्न पुरस्कार अशा विविध पुरस्काराने साहिल रामटेके यांना गौरविण्यात आले आहे.चळवळीच्या क्षेत्रात प्रबोधनाचे कार्य करत असतांना मला मिळालेली ही संधी ज्यामुळे माझे विचार अधिक सुसज्ज पणे लोकांपर्यंत पोहोचतील अशी आशा साहिल रामटेके यांनी व्यक्त केली आहे. उद्याला गडचिरोली येथे होणाऱ्या महाचर्चेत जिल्ह्यातील रोहिदास राऊत,ॲड.कविता मोहरकर,ॲड.विनय बांबोडे, बाळू टेंभुर्णे यांचाही समावेश आहे.ही महाचर्चा लॉर्ड बुद्धा या टीव्ही चॅनलवरून तसेच लॉर्ड बुद्धा या यूट्यूब चॅनलवरून सायंकाळी ६.३० वाजेपासून लाइव्ह राहणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खेडेगावच्या जंगलात जुगाराचा डाव; अड्ड्यावर पोलीसांची धाड.. – तब्बल २२ आरोपींना अटक करून ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील खेडेगावच्या जंगलात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री ते आज मंगळवारी पहाटेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन कुरखेडा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत ३ हजारापेक्षा अधिकच्या रुग्णालयांचे जाळे; आज ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज, मंगळवार २१ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.यात राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या...

आंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. – शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११...

आता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. – विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास घेतली जाणार गंभीर दखल..

उद्रेक न्युज वृत्त :-कोणतेही नियम वा एखाद्या कायद्याची सक्ती ही सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात येते.मात्र,जे नियम वा सक्ती तुम्ही दुसऱ्यांना सांगता त्याच्या अंमलबजावणीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!